लोकसत्ता टीम
नागपूर : ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून असंख्य भारतीयांची आर्थिक फसवणूक होत असल्यामुळे या गेम्सवर बंदी आणावी, याकरिता गोंदिया जिल्ह्यातील अशासकीय सामाजिक संस्थेने (एनजीओ) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.
आणखी वाचा-महिला ड्रग्स तस्कराला ३६ लाखांच्या एमडीसह अटक, पूर्वी देहव्यापार व्यवसायात…
या याचिकेवर सोमवारी, २ ऑक्टोबरला न्यायमूर्ती अतूल चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. दरम्यान ३६५. कॉम, वर्ल्ड ७७७. कॉम, डी२४७.कॉम, लोटूसबुक ३६५.कॉम, या ऑनलाईन गेम्स अॅप्स व लींकवर बंदी आणावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या गेम्समध्ये तत्काळ लाभ मिळण्याचे आमिष देण्यात येत असल्यामुळे व्यक्ती पैशाची गुंतवणूक करतात आणि नंतर त्यांची आर्थिक फसवणूक होत असते. या ऑनलाईन्स गेम्सवर फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नियंत्रण असते. त्यामुळे अनेक व्यक्तींची लाखो रूपयांनी आर्थिक फसवणूक होत असते. याचिकाकर्त्याने या ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.