भारतीय जनता पक्षाचे नेते मुन्ना .यादव व माजी नगरसेविका लक्ष्मी यादव यांच्या मुलाच्या विवाह समारंभाच्या निमित्ताने अजनी येथील निवासास्थानासमोर मोठा मंडप टाकून रस्ता बंद केला. विना परवानगी घरासमोर मंडप टाकून रस्ता बंद केल्यामुळे बुधवारी सकाळी यादव यांच्यावर कारवाई करत उपद्रवी शोध पथकाने त्यांच्याकडून दोन हजार रुपये दंड वसुल केला. पाच दिवसापूर्वी मुन्ना यादव यांच्या अर्जुन आणि करण या दोन्ही मुलांनी खासदार क्रीडा महोत्सवातील क्रिक्रेट सामन्यत गोंधळ घातला होता.या प्रकरणात त्यांना अटक झाली होती.त्यानंतर हा नवा वाद उद्भवला.
हेही वाचा >>>भंडारा : धक्कादायक ! अल्पवयीन मुलाचा ६ वर्षीय मुलीवर अत्याचार
मुन्ना यादव यांनीमुलाचा विवाहासाठी महापालिकेची परवानगी न घेता सार्वजानिक रस्ता बंद करत घरासमोर मंडप टाकला. त्यामुळे लोकांची ये जा बंद झाली.परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर बुधवारी महापालिकेचे उपद्रवी शोध पथक यादव यांच्या निवास्थानी पोहचले आणि त्यांनी यादव यांच्यावर कारवाई करत दोन हजार रुपये दंड केला आणि मंडप खुला करत वाहतुकीसाठी तो रस्ता मोकळा करुन दिला.