गोंदिया : सुप्रसिद्ध कवी, कथाकार आणि चित्रकार प्रा.नंदू वानखडे यांच्या ‘ज्याला नाही माय’  या कथा संग्रहाचा तसेच ‘अंतर्मनातील आंदोलने’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, १४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता गोंदियातील ‘संथागार विहार’ येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्रा. नंदू वानखडे हे वाशिम जिल्ह्याच्या मुंगळा येथील रहिवासी असून सध्या गोंदियाला आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे पूर्व अध्यक्ष तथा ख्यातनाम संवाद तज्ञ आणि समीक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते  दोन साहित्य कृतींचे प्रकाशन होणार आहे.

Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
melghat assembly constituency
मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

हेही वाचा >>> टाटानगर एक्सप्रेस रद्द, दुरान्तोला विलंब

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक युवराज गंगाराम राहणार असून सदर साहित्य कृतींवर सुप्रसिद्ध कवी, कथाकार, चित्रकार प्रमोदकुमार अणेराव आणि कवी, नाटककार प्रा. डॉ.सुरेश खोब्रागडे हे भाष्य करणार आहेत. तर ‘मी नव्या युगाची सावित्री’ या प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेली कु. जुही नंदू वानखडे संचालन करणार आहे. या प्रसंगी साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती उषाकिरण आत्राम, माणिक गेडाम, कालिदास सूर्यवंशी, बापू इलमकर, किरणकुमार इंगळे अकोला, डॉ.सविता बेदरकर, प्रा.मिलिंद रंगारी, प्रा.राहुल तागडे, प्रा.भगवान साखरे, वैशाली वानखडे, जी.जी.तोडसाम, किरण मोरे, उमा गजभिये आणि गीता वानखडे आदी साहित्य साधकांनी केली आहे.