नागपूर: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी एका भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली होती. त्यानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने ससूनच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांनी बदलल्याचे सांगत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) दोन्ही डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.

डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर अशी नोटीस बजावलेल्या दोन्ही डॉक्टरांची नावे आहेत. या घटनेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पुणेतील ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून दुसऱ्याचे नमुने न्यायवैद्यकशाळेत तपासणीला पाठवले होते. यावेळी दुसऱ्याच्या रक्तनमुन्याच्या अहवालावर आरोपीचे नाव निहण्यात आले होते. या गंभीर प्रकरणाची स्वत:हून दखल घेत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) दोन्ही डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उत्तरासाठी सात दिवसांचा कालावधी दिला गेला आहे. त्यांच्या उत्तरानंतर एमएमसीमधील तज्ज्ञांची समिती या प्रकरणाची आणखी चौकशी करेल. त्यात डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांची नोंदणी कायमची रद्द करण्याचे अधिकारही एमएमसीला आहेत.

Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Doctor aggressive after being beaten by relatives The pediatric department of VN Desai Hospital was closed by doctors Mumbai news
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका

हेही वाचा : संतापजनक : नवजात बाळाला नालीत फेकले; पुसदमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना…

“ डॉक्टरांवरील आरोप बघता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने स्वत:हून दोन्ही डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दोघांच्या उत्तरानंतर त्यांची चौकशी केली जाईल. ”

डॉ. विंकी रुघवाणी, प्रशासक, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई.

हेही वाचा : हिट अँड रन… नागपुरातील रामझुला अपघात प्रकरण पुन्हा चर्चेत; आरोपी महिलेला जामीन मिळणार की…

प्रकरण काय?

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ तारखेला ११ वाजता आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. नमुने घेतल्यानंतर त्या रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलमधील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या रिपोर्टवर डॉक्टरांनी या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन आरोपीचे नाव टाकले. या अपघात प्रकरणात आता ससून हॉस्पिटलमधील डॉ. श्रीहरी हलनोर आणि ससूनचे फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे एचओडी अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे. रक्ताच्या नमुन्यामध्ये अजय तावरे यांच्या सूचनेनुसार रक्ताचे नमुने बदलले असल्याचे आढळून आल्याचाही दावा पोलीस आयुक्तांनी पत्रपरिषदेत केला होता. दरम्यान पोलिसांनी आरोपीचे एक रक्ताचे नमुने औंध येथील सरकारी रुग्णालयात पाठवले होते. त्या रिपोर्टमध्ये आरोपीची रक्ताचे नमुने आणि आरोपीच्या वडिलांच्या रक्ताचे नमुन्याशी जुडले आहेत. मात्र, ससून हॉस्पिटलच्या अहवालामध्ये आरोपीच्या रक्ताचे नमुने हे जुळले नाहीत. त्यामुळे आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही चौकशी केली असता यामध्ये फेरफार आल्याचे आढळून आले. त्यानंतर ससून हॉस्पिटल येथील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात जे दुसऱ्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते, ते नेमकी कोणाचे आहेत? याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.