अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : राज्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचार सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात होत असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबई आहे. नागपूर तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. 

पुणे शहरात गेल्या सहा महिन्यांत कौटुंबिक हिंसाचाराच्या २९६ घटना घडल्या. मुंबईत २७६, तर नागपुरात २६० गुन्हे दाखल झाले. या तीन शहरांच्या तुलनेत अन्य शहरांत कमी गुन्हे दाखल आहेत. कुटुंब समुपदेशन केंद्र किंवा भरोसा सेलच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पतीचे मद्यप्राशन, अनैतिक संबंधांबाबत संशय, सासू-सासऱ्यांची देखभाल किंवा संसारात जास्त हस्तक्षेप, वैयक्तिक स्वातंत्र्य न मिळणे, अशी काही कारणे या गुन्ह्यांमागे  आहेत.  

शहर गुन्ह्यांची संख्या

२९६ पुणे</p>

२७६ मुंबई

२६० नागपूर