नागपूर : राज्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढायची असेल तर आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली म्हणून त्यांनी पुण्याच्या जागेवर दावा करणे हे योग्य नाही. ती जागा काँग्रेसकडे होती आणि काँग्रेसकडे राहणार, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
विजय वडेट्टीवार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून लढायचे आहे. यामध्ये तीनही पक्षातील नेत्यांना समजदारीची भूमिका घ्यावी लागणार आहे. महाविकास आघाडी म्हणून लढायचे असेल तर आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. पुण्याची जागा काँग्रेसकडे होती, ती काँग्रेसकडे राहावी असेही वडेट्टीवार म्हणाले. पुण्याची जागा काँग्रेसनेच लढावी असे मोठ मन आघाडीतील सगळ्या नेत्यांनी दाखवावे असेही ते म्हणाले.
हेही वाचा – नागपूर: अकरा वर्षीय मुलीवर शेजाऱ्याचा बलात्कार
असदुद्दीन ओवैसी भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसलेला छोटा बालक आहे. भाजपाने चमच्याने दूध पाजले तर तो चमच्याने पितो. त्यांच्या इशारावर चालणारा मनुवाद्यांना मजबूत करणारा विचार ओवैसी करत आहे, त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही. ज्या कर्नाटकमध्ये लोकांनी ओवैसीला हाकलले तिथे काँग्रेसला भरघोस मते मिळाले, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.