बुलढाणा : नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी देऊन त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्या, अशी मागणी करीत वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी होत एकजूट दाखवली. अक्षय भालेरावची जातीय द्वेषभावनेतून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने समाजबांधवांत संताप उसळला आहे. ही घटना महाराष्ट्रातील पुरोगामी संस्कृतीला काळीमा फासणारी असून संपूर्ण मानवतेला कलंकित करणारी आहे. घटनेचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी उजव्या हाताच्या दंडावर काळ्या फिती बांधल्या होत्या.

हेही वाचा – वर्धा: पिकांना दीडपट हमीभाव दिल्याचा दावा ही शेतकऱ्यांची थट्टा

आंदोलनात अर्जुन खरात, बाला राऊत, नानासाहेब जाधव, अनिल पारवे, विजय पवार, किरण पवार, राहुल वानखेडे, समाधान डोंगरे, राहूल दाभाडे, संतोष कदम, नीलेश जाधव, सतीश गुरचवळे, संदीप गवई, वसंता वानखेडे, समाधान पवार, अनिल पवार, गौतम गवई, अमर गवई, सुरडकर, अमर इंगळे, वानखेडे, मेजर खिल्लारे, रमेश जाधव, गजानन गवई, सुरेश जाधव, शेख यासिन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.

हेही वाचा – मॉन्सूनची गती वाढली, महाराष्ट्राची प्रतीक्षा संपणार

… तर महाराष्ट्रात अराजकता माजेल : पवार

अक्षयच्या मारेकऱ्यांना फाशी देऊन त्याला न्याय द्यावा, ॲट्रॉसिटी किंवा त्याच्या समकक्ष कायदे अधिक कठोर करावेत, त्याच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे अर्थसाह्य द्यावे, कायमस्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सतीश पवार यानी यावेळी बोलताना केली. ही घटना व मागण्याची गांभीर्याने दखल न घेतल्यास पुरोगामी महाराष्ट्रात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punish akshay bhalerao murderes demand vanchit youth aghadi in buldhana scm 61 ssb
Show comments