नागपूर : पंजाबचे मुख्यमंत्री भगवतसिंह मान यांचे मंगळवारी दुपारी नागपुरात आगमन झाले. त्यांचे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. नंतर मान हे मध्य प्रदेशला प्रचारासाठी रवाना झाले. मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आम आदमी पक्षाने त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मान नागपूरमार्गे मध्य प्रदेशला गेले. मान यांचा मध्यप्रदेशातील कटंगी येथे रोड शो आहे. तो आटोपल्यावर ते परत जाणार आहेत.

हेही वाचा : सूर तालाने पाडवा पहाट झाली चिंब! राहुल खरेंच्या गायकीने रसिक मोहीत; ‘शाहू परिवार’चे आयोजन

नागपूर विमानतळावर मान यांचे आगमन होताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आम आदमी पक्ष जिंदाबाद अशा घोषणांनी विमानतळ परिसर दुमदुमून गेला होता. आम आदमी पार्टीने नागपुरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार तयारी केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील विविध प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. मंगळवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या स्वागताच्या निमित्ताने आम आदमी पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

Story img Loader