नागपूर : तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल. मात्र, देवावर विश्वास ठेवा. त्याचे रोज झोपण्यापूर्वी स्मरण करा, त्याला धन्यवाद द्या. आयुष्यात धार्मिक राहाल तरच चुका होणार नाही. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा आणि धार्मिक राहा, असा सल्ला पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी दिला. भारतीय विद्या भवन्स नागपूर केंद्राच्या भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर चिचभवनच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. पुरोहित पुढे म्हणाले, आपल्याला राष्ट्रनिर्माणाचे कार्य करायचे आहे.

भारताला विश्वगुरू बनवायचे आहे. त्यासाठी स्वर्गातून कोणी येणार नाही. हे कार्य आपल्याच करायचे आहे. शिक्षण क्षेत्रावर ही जबाबदारी अधिक आहे. हे काम करताना टीका होते. ती सहन करण्याची ताकद ठेवा. यासाठी आपला देवावर विश्वास हवा. झोपताना रोज देवाचे स्मरण करा. आमचा दिवस चांगला गेला म्हणून देवाला धन्यवाद द्या. यासाठी धर्माचा प्रश्न नाही. हिंदू असाल तर राम, कृष्ण, मुस्लिम असाल तर कुराण, ख्रिश्चन असाल जर येशूचे स्मरण करा. चुका करताना आपल्याकडे देवाचे लक्ष असते ही भीती असते. तुम्ही धार्मिक वृत्तीचे असाल तर चुका होणार नाही. त्यामुळे धार्मिक राहा, असा सल्ला पुरोहित यांनी दिला.

Story img Loader