लोकसत्ता टीम

चंद्रपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कर सहायक परिक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील पूर्वीता वासुदेव मून हिने अनूसुचित जाती प्रवर्गातून महिलांमध्ये राज्यात सातवी रँक घेत उत्तीर्ण झाली आहे.

education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
22 girls in government hostel poisoned in Nandurbar
नंदुरबार जिल्ह्यात शासकीय वसतिगृहातील २२ मुलींना विषबाधा
12 colleges in state offering acupuncture treatment for first time
राज्यात प्रथमच ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची १२ महाविद्यालये
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
Ladki Bahin Yojana application scrutiny Aditi Tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही? आदिती तटकरे महत्त्वाची माहिती देत म्हणाल्या…

विशेष म्हणजे, पूर्वीताचे आई-वडीलांनी मोल-मजुरी करतात. तर कोरपना येथील वैभव विनायक ढोके यांने एकाच वेळी लोकसेवा आयोगाच्या कर सहायक व मंत्रालयीन लिपीक या दोन परिक्षा उत्तीर्ण करत यश संपादन केले आहे. अतिशय गरीब व हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत दोघांनीही लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करीत चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

आणखी वाचा-नागपूर: महावितरणमधील विनंती बदल्या वादात!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२१ मध्ये घेतलेल्या विविध परिक्षांचे निकाल नुकताच जाहीर केला आहे. लोकसेवा आयोगाच्या कर सहायक परिक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील पूर्वीता वासुदेव मून हिने घवघवीत यश संपादन करीत अनूसुचित जाती महिला प्रवर्गातून राज्यात सातव्या रँकने उत्तीर्ण झाली आहे. पूर्वीताचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे झाले. पदवीनंतर तिने स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. २०२१ च्या कर सहायक परिक्षेत यश संपादन केले आहे. अत्यंत गरीब व हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत जिद्द आणि चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या मेहनतीने यश प्राप्त केल्याची प्रतिक्रिया तिने दिली आहे. सोबतच कोरपना येथील वैभव विनायक ढोके यांने एकाच वेळी लोकसेवा आयोगाच्या दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. कर सहायक व मंत्रालयीन लिपीक या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. मागील पाच ते सहा वर्षांपासून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत होते. दोघांनही आपल्या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक, आप्तेष्टांना दिले आहे.

Story img Loader