अलीकडेच झालेल्या खातेवाटपात सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले दादा भुसे आज समृद्धी महामार्गाच्या पाहणीला निघाले आहे. यादरम्यान ते विविध उपाययोजनांचा आढावा करणार आहे. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास भुसे यांच्या पाहणी दौऱ्याला नागपूर येथून प्रारंभ झाला आहे. हा दौरा ऐनवेळी ठरल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा >>> नागपूर शहरातील अर्धेअधिक सिग्नल बंद, सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा नादुरुस्त
प्राप्त माहितीनुसार ते नाशिक नजीकच्या महामार्गापर्यंत पाहणी करतील. वरिष्ठ शासकीय सूत्रांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभागाचे अधिकारी राहणार आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा( ता. सिंदखेड राजा) येथे झालेल्या भीषण अपघातानंतर संबधित यंत्रणा खडबडून जागी आणि सक्रिय झाल्या आहे. यामुळे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे.