बुलढाणा : राज्यातील पेपरफुटीची मालिका अजूनही कायमच आहे. बुलढाणा जिल्ह्यात परिचारिका अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे आज आढळून आले. विध्यार्थ्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर पूर्ण प्रश्नपत्रिकाच आल्याचे आणि आजच्या पेपरमधील प्रश्न जवळपास सारखेच असल्याचे प्राथमिक चौकशी आढळून आले. याप्रकरणी आत्तापर्यंत पाच परीक्षार्थींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून प्रश्नपत्रिका मिळालेल्या परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भंडारा: खळबळजनक! ‘येथे’ पैसे घेऊन सुरू होती भरती प्रक्रिया; गोपनीय पद्धतीने…

बुलढाणा शहरातील एका परीक्षा केंद्रावर घडलेल्या या प्रकाराची माहिती नर्सिंग परीक्षा मंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून त्यांनी, तातडीने कडक कारवाई करा असे आदेश दिले आहे. राज्यात आज परिचारिका अर्थात जीएनएम द्वितीय वर्षाचा पेपर होता. बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक शासकीय रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहामध्ये एक केंद्र आणि दुसरे केंद्र हे शहरातीलच पैनगंगा नर्सिंग कॉलेज हे होते. सकाळी ११ ते २ या वेळेत पेपर सुरू असतानाच शासकीय परिचारिका वसतिगृहात काही विद्यार्थी कॉपी करत असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. एका विद्यार्थ्यांच्या शर्टाच्या बाहीवर नक्कल (कॉपी) असल्याचे आढळले. ही बाब लक्षात येताच त्या विद्यार्थ्याची तपासणी आणि प्रश्नांची पडताळणी करण्यात आली असता पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा >>> ” देवाभाऊ …”आता भाजपच्या प्रचाराची नवी टॅगलाईन

या घटनेची माहिती नर्सिंग परीक्षा मंडळाला (एमएसबीएनपी) देण्यात आली. त्यानंतर पाच परीक्षार्थींचे मोबाईल जप्त करण्यात आले. पेपरनंतर  लिंकची तपासणी केली असता त्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर संपूर्ण प्रश्नपत्रिकाच आल्याचे आढळून आले. अधिक चौकशी आणि तांत्रिक पडताळणीअंती बुधवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास परीक्षार्थींच्या मोबाइलवर प्रश्नपत्रिका आल्याचे दिसून आले. सखोल तपासणीत बऱ्याच विद्यार्थ्यांना आज होणाऱ्या पेपरची कॉपी रात्रीच त्यांच्या व्हाट्सअॅपवर आली होती, असे उघडकीस आले. राज्यात आज जीएनम द्वितीय वर्षाची परीक्षा होती. मानसिक आरोग्य परिचर्या विषयाचा आज तिसरा पेपर होता. बुलढाणा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहामध्ये एक केंद्र आणि दुसरे केंद्र हे पैनगंगा नर्सिंग कॉलेज या ठिकाणी होते. आज सकाळी ११ ते दोन या वेळेत पेपर सुरू होता. शासकीय परिचारिका वसतिगृहात काही विद्यार्थी कॉपी करत असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले, त्यांनी अजून तपासणी केली असता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आज होणाऱ्या पेपरची कॉपी रात्रीच त्यांच्या व्हाट्सअॅपवर आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र प्रभारींनी सदर बाब वरिष्ठांना कळविली आहे, आठ ते दहा विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती परीक्षा केंद्राच्या प्रभारी मीना शेळके यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question paper of nursing exam leaked in buldhana district scm 61 zws