नागपूर: प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची नियुक्ती लांबल्याने तर्कवितर्क लावणे सुरू आहे. या पदासाठी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. यावर भाजप नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरमध्ये प्रतिक्रिया दिली. या पदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. पण ते हे पद स्वीकारण्यास तयार नाही, असे ते उपरोधिकपणे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्ता होती म्हणून लोक होते. आता काँग्रेसची सत्ता नाही आणि येण्याची शक्यता नाही. एवढी निश्चांकी काँग्रेसने कधी गाठली नव्हती. त्यामुळे प्रत्येक जण दुसरीकडे बोट दाखवत आहे. प्रदेश अध्यक्ष पद कोणी घ्यायला तयार नाही. हर्षवर्धन सपकाळ माझे चांगले मित्र आहे.. त्याला संधी मिळाली तर चांगली गोष्ट. मात्र दिग्गज नेत्यांना डावलून संधी दिली हे म्हणणं योग्य नाही. कारण दिग्गजच पळून गेले सगळे. सत्ता नाही म्हणून संधी नाकारणारे हे दिग्गज यांचं पक्षश्रेष्ठी समोर पितळ उघड होत आहे, असा टोला त्यांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला.

महाविकास आघाडीत वाद

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्याची बिघाडी सुरु होती. सत्ता मिळवणे हा एकमेव उद्देश होता. राज्याच्या किंवा समाजाच्या हितासाठी ते एकत्र आले नव्हते.

लाडकी बहीण योजनेवर न्यायालयाची नाराजी..

लाडकी बहीण योजनेवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यावर विखे पाटील म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या मतावर भाष्य करणे उचित नाही. राज्यात सुरू असलेल्या कल्याणकारी योजना या जनतेच्या हितासाठी आपण सुरू केल्या आहेत. न्यायालयाने काय मत मांडले याबद्दल मला काही माहिती नाही. शेतीमध्ये मजूर मिळत नाही हे सगळे कारणे असले तरी याकरिता योजना बंद करण्याची गरज नाही. वेगळा पर्याय असू शकतो यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे.

नेते पक्ष प्रवेश

कोण कुठे जात आहे. त्याबद्दल मला जास्त माहिती नाही मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांना संन्यास घेतल्याशिवाय मार्ग नाही.. म्हणून ते पर्याय शोधत आहे, असे विखे पाटील म्हणाले. भुजबळ यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता याबाबत पक्ष नेतृत्व घेईल, असे त्यांनी सांगितले. माझ्या माझ्या कोणी संपर्कात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवभोजन थाळी बंद करण्यासंदर्भातले कोणतेही आदेश झाल्याचे माझ्या निदर्शनास नाही.

महायुतीत वाद नाही

महायुतीत कोणताही वाद नाही. सरकार उत्तम सुरू आहे कोणतीही नाराजी नाही. सरकार चांगलं चालत असल्याने काही लोकांच्या पोटात दुखायला लागले आहे, असे विखे पाटील म्हणाले.