नागपूर : जंगलाला लागणाऱ्या आगीच्या धुरामुळे बाहेर पडणाऱ्या किरनोत्सर्गाच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर परिणाम होऊ शकतो. वातावरणातील उर्जा संतुलनावर त्याचा परिणाम होतो. ‘लीबनिझ इन्स्टिटय़ूट फॉर ट्रोपोस्फेरिक रिसर्च’च्या (ट्रोपोज) चमूने ऑस्ट्रेलियातील २०१९/२० च्या जंगलातील आगीच्या विश्लेषणातून काढलेला हा निष्कर्ष आहे.
हेही वाचा >>> भाजप आणि शरद पवार एकत्र येणे अशक्य – आमदार बच्चू कडूंचे मत
धुराच्या ‘सिम्युलेटेड’ परिणामांमुळे हवेच्या वरच्या थरांमध्ये तापमानात काही अंश सेल्सिअसची वाढ झाली. २०१९/२०२० च्या सुमारास ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेली आग विलक्षण होती. ऑस्ट्रेलियन आगीची तीव्रता शेवटच्या मोठय़ा ज्वालामुखीच्या उद्रेकाशी तुलना करता येण्यासारखी होती. उत्सर्जित झालेल्या धुराचा पृथ्वीच्या हवामानावरही परिणाम झाला. धुराचे कण त्यात असलेल्या काजळीमुळे वातावरणात लक्षणीयरीत्या गरम करतात. सध्याच्या ‘ट्रोपोज’च्या अभ्यासामध्ये मागील वर्षांच्या कामावर आधारित हा अभ्यास आहे आणि जंगलातील आगीच्या कणांचे परिणाम सर्वसमावेशकपणे मोजण्यासाठी जागतिक एरोसोल हवामान मॉडेल ‘इकॅम—हॅम’ वापरले आहे. संगणक ‘सिम्युलेशन’च्या सहाय्याने, ऑस्ट्रेलियन धुराने सूर्यप्रकाश शोषून घेतल्याने वरच्या ‘ट्रोपोस्फियर’ आणि खालच्या ‘स्ट्रॅटोस्फियर’च्या तापमानात काही अंश सेल्सिअसने प्रासंगिक वाढ झाली हे दाखवणे शक्य झाले. विशेष म्हणजे, हे केवळ दक्षिण गोलार्धात स्थानिक पातळीवरच घडले नाही, तर काही महिन्यांच्या कालावधीत उष्ण कटिबंधातून उत्तर गोलार्धात सकारात्मक तापमानाची विसंगती देखील वाढली. या अभ्यासात असे दिसून आले आहे की मोठय़ा जंगलातील आगीमुळे निघणाऱ्या धुरामुळे जागतिक परिसंचरणात बदल होऊ शकतात.
या निष्कर्षांनुसार केवळ सिरस ढगांचे आवरण कमी झाले नाही, तर संपूर्ण जलचR ऑस्ट्रेलियन आगीमुळे कमकुवत झाले असावे.
– डॉ. फॅबियन सेन्फ, ‘ट्रोपोज’ मधील अभ्यासक