नागपूर : कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रघुजीनगर, सक्करदरा येथील जलतरण गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. ज्या पद्धतीने डागडूजीचे काम सुरू आहे ते बघता जलतरण तलाव पुन्हा कामगारांच्या उपयोगी कधी पडेल ते सांगणे कठीण आहे.सर्वसामान्यांचे कोणतेही प्रश्न असो शासन व प्रशासन स्वत:हून सोडवण्याची तसदी घेत नसल्याचे अनेक उदाहरण आहे. त्यास कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रघुजीनगर, सक्करदरा येथील जलतरण तलाव अपवाद ठरले असते तर नवलच. करोना काळात बंद करण्यात आलेल्या हे स्वीमिंग पूल डागडूजीच्या दिरंगाईमुळे बंद आहे. जलतरण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण, त्याची देखभाल, वापरासंबंधी निविदा काढण्यात आली नाही. कामगार कल्याण विभागाने रघुजीनगर येथील जलतरण तलाव हे कामगार आणि त्यांच्या पाल्यांसाठी नागपुरात एकमेव जलतरण तलाव आहे. तो देखील गेल्या पाच वर्षांपासून ओसाड पडलेला आहे. या जलतरण तलावावर उन्हाळ्याच्या सुटीत पोहणे शिकणाऱ्यांची मोठी गर्दी असते. आता मार्च महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपतील. त्यावेळी त्यांच्यासाठी पोहणे शिकण्याचा पर्याय उपलब्ध नसणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा