रोहित वेमुला प्रकरणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी करीत असलेले आंदोलन राजकीय असल्याची टीका केंद्रीय कौशल्य विकास खात्याचे राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी येथे केली. शनिवारी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रातील सरकार हे जनतेने निवडलेले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल व्यथित झाले आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिकाही नीटपणे वठवू शकत नाही. ज्यांनी लोकशाहीची हत्या केली तेच आता लोकशाहीवर गप्पा करीत आहे. राहुल या मुद्यावर पीएच.डी. करीत असल्याची टीका करीत रुडी यांनी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडविली.

Story img Loader