नागपूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये झालेले संविधान सन्मान संमेलन सर्वार्थाने गाजले. यात राहुल गांधी यांनी दिलेले भाषण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू शकते.

राहुल गांधी यांनी संविधानाचे महत्व समजावून सांगितले. ते म्हणाले संविधान नसते तर देशात लोकशाहीच नसती. निवणूक आयोगच नसते. स्वातंत्रपूर्व काळात देशात अनेक राजे होते. त्यांच्या राज्यात लोकशाही नव्हती, तेथे निवडणुकाही घेतल्या जात नव्हत्या. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना मतांचा अधिकार दिला. त्यामाध्यमातून तो दिल्लीतील सत्ता बदलवू शकतो. हे संविधानाचेम्हत्व आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा…उमेदवारी मागे घेण्यासाठी अपक्ष उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी पत्र देवून ….

संविधानाने समाजातील मागास घटकांमध्ये आरक्षण दिले. पण केवळ पाच टक्के लोकच देशाची सुत्रे आपल्या हाती ठेवून आहेत. दिल्लीत केंद्रीय मंत्रालयात मोजकेच दलित, आदिवासी, मुस्लिम सचिव पातळीवरचे अधिकारी आहेत. हीच बाब उच्च न्यायालयात आहे. रुग्णालयात मागासवर्गीय डॉक्टर्स नाही. देशात पाचशे कार्पोरेट कंपन्या आहेत. केंद्र सरकारने त्यांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. या कंपन्यात मागासवर्गीय अधिकारी नाही, याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

कर्नाटकात आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आमच्यावर टीका करण्यात आली. शेतकऱ्यांची सवय बिघडवण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत असल्याचा आरोप करण्यात आला. पण मोठ्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये कर्ज माफ केले जाते तेंव्हा कोणीच बोलतनाही. जेव्हा आम्ही ९० टक्के लोकांच्या हितासाठी आवाज उठवतो तेव्हा तुम्ही टिकेचे लक्ष्य ठरतात. देशातील ९० टक्के लोकांवर सध्या अन्याय होत आहे. रोज होत आहे. त्याविरोधात लढा देणे हेच आमचे कर्तव्य आहे. जातनिहाय जनगणना हे यावरचा उपाय आहे. ही गणना कोणीच थांबवू शकत नाही. सरकारला जातनिहाय जनगणना करावीच लागेल त्याच प्रमाणे आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा उठवावीच लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा…नागपुरातील संविधान सन्मान संमेलन : विश्वंभर चौधरी म्हणाले ‘ ज्यांनी राष्ट्रपित्याला मारले….”

राहुल गांधी यांच्या भाषणाला उपस्थितांकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या भाषणाच्या वेळी सुरेशभट सभागृह गच्च भरले होते. जातनिहाय जनगणना हेच आमचे लक्ष आहे, असे राहुल गांधी म्हणाले. अमन कांबळे यांनी आभार मानले. नागपूरमध्ये झालेले संमेलन यशस्वी झाले. समानता विरुद्ध विषमता असे या पार्श्वभूमीवर यासंमेलनाकडे बघितले जात होते. त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे ते यशस्वी झाल्याचे दिसून आले