नागपूर : राहुल गांधी स्वतःच बोलले की या देशात आरक्षणाची गरज नाही. बाबासाहेबांचा संविधान ८० वेळा बदलण्याचे काम काँग्रेसने केला आहे. शिवाय बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा पराभूत करण्याचे काम त्यांनी केले आहे. काँग्रेसला कधीच बाबासाहेबांचे विचार रुचले नाही, राहुल गांधी हे बाबासाहेबांच्या विचारांचे विरोधी असून ते संविधानाच्या गोष्टी करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होेते. राहुल गांधी यांच्यासोबत १६५च्यावर शहरी नक्षलवादी विचारांचे लोक आहे. एका बाजूला संविधानाच्या गोष्टी करायची आणि संविधानाने मीडियाला दिलेला स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी शहरी नक्षलवादाला पाठिंबा देण्यासाठी, राष्ट्रविरोधी कारवाया करण्यासाठी, त्यांची कौन्सिलिंग करण्यासाठीच नागपुरात आले आहे. हे पुन्हा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली शरद पवारांबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही. निवडणुकीपूर्वी सहानुभुती मिळवण्यासाठी प्रयत्क्करत असतात. यापूर्वी केले आहे.कधी पावसात भिजले आहे, कधी सहानुभूती कार्ड खेळले आहे, मात्र जनता आता त्यांच्या सहानुभूतीवर जाणार नाही, तर आम्ही केलेल्या कामाकडे जनता लक्ष देतील असेही बावनकुळे म्हणाले. पहिल्या टप्प्यात आम्ही ४० पदाधिकाऱ्यांना निलंबित केले असून ज्यांनी महायुती उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले, पक्षाच्या शिस्तीचा भंग केला, अशांना निलंबित केले आहे. भाजप कार्यकर्तासाठी पक्ष हा आई सारखा आहे.त्या पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे ४० पदाधिकाऱ्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले. प्रचारादरम्यान सुद्धा जे पदाधिकारी पक्ष विरोधी कारवाई करतील, अशा पदाधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई होईल. प्रचारात मित्र पक्षाचा प्रचार करणार नाही किंवा मित्र पक्षाच्या उमेदवार सोडून दुसऱ्या पक्षासाठी प्रचार करणार त्या भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधातही आम्ही कारवाई करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. उद्योग ठाकरे यांनी केवळ टीका करण्याचे काम राहिले आहे आणि तोच त्यांचा अजेडा आहे. अशाने ते महाराष्ट्राचे नुकसान करत आले आहे असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा…जातीय जनगणनेची गोष्ट करताच मोदींची झोप उडाली… आता कितीही अडवण्याचा…राहुल गांधींच्या वक्तव्याने…

संजय राऊत जरी शरद पवारांचे कौतुक करत असेल तरी शरद पवारांनीच उद्धव ठाकरे यांना नाही तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचे ठरवले आहे असेही बावनकुळे म्हणाले. राज ठाकरे यांनी त्यांचे मत मांडले आहे. मात्र दहा वर्षांपूर्वीचा विदर्भ आणि आजचा विदर्भ यात बदल झाला आहे. विविध समाज घटकांचा विकास झाला आहे. सिंचन वाढले आहे. काँग्रेसचे ४५ वर्ष आणि आमचे दहा वर्ष यात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल असेही बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi opposed reservation while congress amended babasahebs constitution 80 times said bjp vmb 67 sud 02