नागपूर : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने बुधवारी नागपुरात आले. राहूल गांधी यांनी सर्वात आधी दीक्षाभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्ध यांना अभिवादन केले. नागपुरात आगमन होताच राहूल गांधी यांचे अनेक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे निमित्त साधून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संविधानाची सुरक्षा करणे आवश्यक

ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे हे संमेलन सुरेश भट सभागृहात संविधान सन्मान संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी राहुल गांधी नागपुरात आले आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. ९३ वर्षीय लीलाबाई चितळे यांनी राहूल गांधी यांचे स्वागत केले. त्याच्यासोबतची भेट प्रेरणादायी होती. त्यांनी १९४२ च्या भारत छोटो आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या बाळापूर येथील यात्रेत सहभागी झाल्या होत्या. संविधानाची सुरक्षा करणे आवश्यक आहे, असे त्यांना राहूल गांधी यांना सांगितले.

हेही वाचा…संघभूमी नागपुरात राहुल गांधींचे संविधान सन्मान संमेलन, राजकीय वर्तुळाचे लक्ष

u

भारत जोडो यात्रेतील भेटीला उजाळा

लिलाताई चितळे यांनी राहूल गांधी यांचे स्वागत केले. काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील या यात्रेत ९३ वर्षीय लीलाबाई चितळे सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे लीलाबाई चितळे यांनी भारत छोडो यात्रेत सहभाग घेतला होता. लीलाबाई बाळापूरजवळ भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधींसह सर्व नेत्यांनी लीलाबाई यांचे फोटो शेअर केले होते. काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी ट्वीट केले होते. ९३ वर्षीय लीलाबाई चितळे यांच्यासोबतची भेट प्रेरणादायी होती. लीलाबाई या जेलमध्येही होत्या. लीलाबाई म्हणाल्या, ९ ऑगस्ट १९४२ ला त्या १२ वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी यांनी करो या मरोचा नारा दिला होता. त्या वयाने लहान असल्यानं त्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून देण्यात आले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi visited nagpur for constitution honor conference ahead of assembly elections dag 87 sud 02