नागपूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी शहरातील विविध भागांतील क्रिकेट बुकींनी जरीपटका आणि लकडगंजमध्ये बैठक सुरू केली आहे. भारतविरुद्ध न्यूझीलँड संघादरम्यान झालेल्या सामन्यावर क्रिकेट नारा रोडवरील मराठा सावजीच्या वरच्या माळ्यावर सट्टेबाजी सुरू असताना जरीपटका पोलिसांनी छापा घातला. पोलिसांनी युवराज हरयानीला ताब्यात घेतले. मात्र, आर्थिक व्यवहार करून त्याला सोडून दिल्याची चर्चा आहे.

युवराज हरयानी हा शर्मा नावाच्या बुकीच्या आयडीवर क्रिकेटची खायवाडी-लगवाडी करीत होता. नारा रोडवरील मराठा सावजीच्या वरच्या माळ्यावर सट्टेबाजी सुरू होती. जरीपटक्याचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या पथकाने छापा घातला. युवराजला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला मध्यरात्री एक वाजता पोलिसांनी चौकशी न करता सोडून दिल्याने संशय निर्माण झाला. जरीपटका पोलिसांनी मोठी रक्कम घेऊन युवराजला सोडून दिल्याची चर्चा आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा

हेही वाचा – नागपूर : नायजेरीयन टोळी सायबर पोलिसांच्या जाळ्यात, दोन देशांच्या पासपोर्टसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या भीतीमुळे नागपुरातील शंभरावर बुकी भंडारा, गोंदीया, गोवा आणि दुबईला पळाले आहेत. मात्र, काही बुकींनी ठाणेदारांना हाताशी धरून शहरात सट्टेबाजी सुरू केली आहे. जरीपटक्यातील रिंग रोडवर आणि वर्धमानगरातील काही हॉटेलमध्ये बिनधास्त सट्टेबाजी करीत आहेत. जरीपटक्यातील शैलेश, कुकरेजा, जॅकी, आसूदानी, बंटी ज्यूस, खुबानी, पंकज कढी, रवींद्र, शर्मा, सोनी अंडा, राहुल, जनयानी, आकाश बॅटरी, विक्रम, जैसवानी, एस. के, रोहन, गोपानी आणि बंटी यांनी एकत्र येऊन काही पोलीस अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून क्रिकेट सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या ताब्यातील युवराजने दिली होती. त्यामुळे जरीपटका आणि लकडगंज परीसर पोलीस आयुक्तांच्या रडारवर आले आहेत.

हेही वाचा – “डॉ. आंबेडकरांची ‘ती’ दोन भाषणं पारायण करण्यासारखी आहेत, वारंवार…”; मोहन भागवतांचं वक्तव्य

शैलू याची अनेक वर्षांपासून काही पोलीस कर्मचाऱ्यांशी मैत्री आहे. खासगी बँकेसाठी दररोज पैसे गोळा करणारा शैलू आता आउटर रिंगरोडवरील कोट्यवधी रुपयांच्या हॉटेलचा भागीदार आहे. याच हॉटेलमध्ये मोठमोठे बुकी जमा होऊन सट्टेबाजी करतात. त्यांना पोलिसांचेच संरक्षण असल्याची माहिती समोर आली आहे.