अकोला : स्वच्छ अन्न दिनानिमित्त भुसावळ विभागातील रेल्वेस्थानकांवर असलेल्या उपहारगृहांची आरोग्य निरीक्षकांकडून रविवारी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये खाद्यपदार्थांचा दर्जा राखल्या जावा म्हणून नमुने घेण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वच्छता पंधरवाड्याअंतर्गत २४ सप्टेंबर रोजी स्वच्छ अन्न दिनानिमित्त भुसावळ विभागातील खांडवा, भुसावळ, बडनेरा, नांदगाव, मनमाड आदी स्थानकांवरील उपहारगृह, खाद्य पदार्थांचे दालन, प्रशिक्षण संस्था आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील उपहारगृहांची कसून तपासणी मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांनी केली.

हेही वाचा – गोंदिया : गणेशोत्सवावर चांद्रयानाची छाप; रॉकेट, विक्रम लॅडर अन् प्रज्ञान रोव्हरच्या प्रतिकृती ठरताहेत लक्षवेधी

हेही वाचा – सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची अडचण होणार; पश्चिम व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना…

तपासणीदरम्यान उपहारगृह व खाद्यपदार्थांचे दालन, ‘रनिंग रूम’, विक्रेते, कर्मचारी, खाद्यपदार्थांचा दर्जा, स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी भांडी, साठवण कक्ष, पाकीट बंद खाद्यपदार्थांची मुदत आदींची तपासणी करण्यात आली. सुका कचरा व ओला कचरा विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छतेच्या कामात कायमस्वरुपी सुधारणा करण्यासाठी दालनधारकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी कच्चा मालाच्या खाद्यपदार्थांचे नमुनेही घेण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway administration on alert mode to maintain food quality a thorough inspection of restaurants special campaign in bhusawal division ppd 88 ssb