रेल्वे अर्थसंकल्प पुढील महिन्यात सादर होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या अर्थसंकल्पातून जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून रेल्वे तिकीट खरेदी सुलभ करण्यापासून ते स्वच्छता आणि उत्पन्न वाढविण्याच्या विविध योजना सूचवल्या आहेत.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या संकेतस्थळावरील ‘सजेशन फॉर रेल बजेट २०१५’ या अंर्तगत लोकांकडून १५ जानेवारीपर्यंत सूचना मागवल्या होत्या. अनारक्षित तिकीट आणि रेल्वे फलाट तिकीट इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाऊ शकते. आम्हाला अनारक्षित आणि फलाट तिकीट खरेदी करताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. या तिकिटांसाठी नेहमीच रांगा लागलेल्या असतात. सरकारने यासंदर्भात विचार करून आवश्यक पावले उचलावीत, असे अतुल बडवाईक यांनी सूचविले आहे.
तिकीट रद्द करण्याचे नियम, तिकीट रद्द करण्याचे शुल्क अत्यल्प असल्याने प्रवास करायचा की नाही हे निश्चित नसतानादेखील अनेकदा प्रवाशी तिकीट खरेदी करून ठेवतात. यामुळे ज्यांना खरच प्रवास करायचा आहे. त्यांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे तिकीट रद्द करण्याचे दर वाढण्यात यावे. त्यामुळे इतर प्रवाशांची अडवणूक थांबण्यास बरीच मदत होईल. तसेच तिकीट आरक्षण प्रणालीत विनाकारण होणारी देवाण-घेवाण कमी होईल, असेही ते म्हणाले.
वेब लिंक अपडेट- ‘इंडियनरेल डॉट जीओव्ही डॉट इन तसेच इतरही रेल्वे लिंक अद्ययावत असले पाहिजे. सर्व ठिकाणी/ सर्च पेजवर केवळ रेल्वे यूआरएल अचूक प्रकाशित झालेले नाही. कलर फूट-स्टेप्स- तंत्रज्ञान आणि धातू शास्त्राने खूप प्रगती केली आहे. पण आपल्या भारतीय रेल्वेत अजूनही पायऱ्यांसाठी कठीण स्टिलचा वापर केला जातो. या पायऱ्यांमुळे दरवर्षी अनेक प्रवाशांचे प्राण जात आहेत. मला तर त्या पायऱ्यांकडे बघूनच धडकी भरते. आपण त्या चांगल्या धातूपासून तयार करून रेल्वे आणि फलाट यांच्यामध्ये पडणाऱ्या प्रवाशांचे जीव वाचवू शकत नाही काय, असा सवालही समीर अहलुवालीया यांनी केला. क्रमश:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway budget at coming soon