INDIAN RAILWAY UPDATED वर्धा: रेल्वे मंडळाने काही थांबे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिने काही गाड्यांचे थांबे राहतील. पुढे तिकीट विक्रीचा आढावा घेवून थांबे कायम करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

३० मार्चपासून मदुराई-चंदीगड एक्स्प्रेसचा चंद्रपूर, १ एप्रिलपासून हैदराबाद-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस भांदकला, ३१ मार्चपासून अमरावती-नागपूर एक्स्प्रेस सिंदी, एक एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर एक्स्प्रेस बडनेरा येथे तर चार एप्रिलपासून हजुर साहिब नांदेड ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा भुसावळ येथे थांबा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तिकीट विक्रीचा आढावा रेल्वे मंडळास पाच महिन्यात सादर करायचा आहे. सध्या या गाड्या धावत आहेच. केवळ थांब्याबाबत निर्णय झालेला आहे.

Story img Loader