वर्धा : सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांची झुंबड आहे. आगामी एप्रिल अखेरपर्यंत महत्वाच्या गाड्यांचे आरक्षण ‘ फुल्ल ‘ झाल्याची माहिती असून नागपूर- पुणे हा मार्ग अत्यंत व्यस्त असल्याची आकडेवारी आहे. उन्हाळी सुट्टीच्या दिवसात हे नेहमीचे चित्र असले तरी यावेळी दिडशेवर ,’ वेटिंग लिस्ट ‘ म्हणजे रेल्वे प्रवासासाठी अधिक गाड्यांची गरज ठरते.वर्धा स्थानकातून महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर एक्सप्रेस, गरीब रथ, आझाद हिंद, मेल या प्रमुख गाड्यांचे आरक्षण अशक्य ठरत आहे.नागपूर पुणे मार्ग अत्यंत व्यस्त असल्याचे चित्र आहे. विद्यार्थी, चाकरमानी व आय टी क्षेत्रात स्थिरावलेले या काळात प्रवासासाठी आतुर असल्याने आरक्षणावर उड्या पडत असल्याची स्थिती आहे. येत्या दोन महिन्यासाठी अधिक गाड्या सोडण्याचा सूर रेल्वे प्रवाशांकडून उमटत आहे.