गोंदिया : गोंदिया – बल्लारशाह या रेल्वे एकेरी मार्गावर प्रवासी गाड्यासह मालगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूकीत अडथळा निर्माण होऊ नये व वेेळेची बचत करण्याकरीता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २४० कि.मी लांबीच्या दुसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी ४,८१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

या मार्गावर दुहेरी मार्गामुळे गाड्यांची गती वाढेल आणि विलंब कमी होईल.दुसरी लाईन आल्याने प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग मिळेल. औद्योगिक आणि आर्थिक वाढ: विदर्भातील उद्योग व वाणिज्य केंद्रांना चालना मिळेल.पर्यटन आणि रोजगार संधी: सुधारित रेल्वे सुविधांमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक रोजगार संधी वाढण्यास मदत होणार आहे.तसेच गोंदिया,भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

शिवनाथ, इंटरसिटी आणि जनशताब्दी एक्सप्रेस १४ एप्रिल पासून कात टाकणार…!

गोंदिया :- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या गोदिया मार्गे धावणाऱ्या सर्व गाड्यांना नियोजन बद्ध पद्धतीने जुन्या पारंपरिक डब्यांच्या जागी सोयीचे, आरामदायी आणि सुरक्षित नवीन तंत्रज्ञानाचे डबे प्रदान करण्यात आले आहेत. वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक दिलीप सिंग म्हणाले की नवीन लावण्यात आलेले कोच प्रवाशां साठी आरामदायी आणि सोयीस्कर आहे. सामान्य डब्यांच्या ११०/१३० कि.मी./ताशी कमाल वेगाच्या तुलनेत १६० कि.मी./ताशी पेक्षा जास्त वेगा साठी डिझाइन केलेले एलएचबी कोच देखील रेल्वे ऑपरेशन्स च्या दृष्टीने अतिशय सुरक्षित आहेत.

आय.सी.एफ . कोचच्या तुलनेत एल.एच.बी. कोचमध्ये बर्थची संख्याही जास्त असते. स्लीपर कोच प्रवाशांच्या सुविधेचा विस्तार करण्यासाठी, नागपूर विभाग शिवनाथ, इंटरसिटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस मध्ये कायम स्वरूपी एक अतिरिक्त स्लीपर कोच जोडत आहे. सोमवार १४ एप्रिल पासून ट्रेन बिलासपूर-इतवारी इंटरसिटी एक्स्प्रेस आणि शिवनाथ एक्स्प्रेस आणि मंगळवार १५ एप्रिल पासून इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस मध्ये एक अतिरिक्त स्लीपर कोच सह एकूण २२ एलएचबी कोच असतील. ज्यामध्ये १ जनरेटर/लगेज वन, १ एसएलआर, ४ जनरल, ७ स्लीपर, ५ एसी तृतीय, १ एसी तृतीय इकॉनॉमी, २ एसी-टू, १ फर्स्ट एसी श्रेणीचा समावेश आहे. त्याच प्रमाणे गोंदिया – रायगड जनशताब्दी एक्स्प्रेस मध्ये रविवार १३ एप्रिल पासून अतिरिक्त नॉन-एसी चेअर कार सह एकूण १९ डबे असतील आणि रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस मध्ये सोमवार १४ एप्रिल २०२५ पासून एकूण १९ डबे असतील. ज्यामध्ये १ जनरल/सामान्य , एसएलएसी, १४ नॉन-एसी चेअर कार, ०३-एसी, एसी चेअर कार या गाडीत असणार आहे.