लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑल इंडिया एससी, एसटी, रेल्वे एम्लॉईज असोसिएशनच्या वार्षिक संमेलनाला नागपुरात हजेरी लावली. रेल्वे स्टेडियममध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी ते विशेष विमानाने दिल्लीहून नागपुरात आज सकाळी दाखल झाले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे २० नोव्हेंबरला नागपूर आणि रायपूरच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु अचानक हा दौरा रद्द करण्यात आला होता. अलिकडेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे या निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी होते. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळविण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर होते. त्यासाठी पक्षाने पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना प्रभारी आणि वैष्णव यांना सहप्रभारी नियुक्त केले होते.

आणखी वाचा-निकालाच्या एक दिवसाआधी राजकीय संन्यास; पण, पक्ष विजयी होताच माजी आमदाराने…

ऐन निवडणुकीच्या काळात त्यांचा नागपूर आणि रायपूर दौरा होणार होता. परंतु तो रद्द करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुन्हा त्यांचा नागपूर दौरा ठरला. वैष्णव हे इंडिया एससी, एसटी, रेल्वे एम्लॉईज असोसिएशनच्या वार्षिक संमेलनात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ते विशेष विमानाने दिल्लीहून आज सकाळी नागपुरात दाखल झाले. संमेलनानंतर त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, नागपूरच्या सदस्यांनी वैष्णव यांचे स्वागत केले.

रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे अधिक सोयीस्कर कशी बनवता येईल यासाठी काम करत आहे. आपल्या देशातील सामान्य नागरिकांनी अवघ्या ४०० रुपयांमध्ये लग्झरी सुविधांचा लाभ घेत १,००० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीचा रोडमॅप आम्ही तयार केला आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी सांगितले होते.

आणखी वाचा-ताडोबातील ‘झीनत’ सिमिलीपालच्या जंगलात पोहोचली…

रेल्वे सध्या काही खासगी ट्रेन चालवत आहे. यासह केटरिंग सेवांसह इतर काही सेवांसाठी खासगी कंपन्यांबरोबर काम करत आहेत. अनेक खासगी कंपन्या रेल्वेचा वापर करत आहेत. यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा होत आहे. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. या अफवा पसरवणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो की, रेल्वे व संरक्षण विभाग भारताचा कणा आहेत. राजकारणापासून या दोन विभागांना दूर ठेवायला हवे, असेही ते म्हणाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway minister ashwini vaishnav visited deekshabhoomi rbt 74 mrj