लोकसत्ता टीम

नागपूर : रेल्वे भरती बोर्डतर्फे (आरआरबी) घेण्यात येणारी सहायक लोको पायलट भरतीसाठीची सीबीटी-२ परीक्षा १९ मार्चला देशातील विविध परीक्षा केंद्रावर सुरू करण्यात आली. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने नागपुरात दोन परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली होती. परंतु, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पहिल्या पाळातील परीक्षा रद्द करावी लागली.

नागपूरमधील वर्धमाननगर येथील व्हीएमव्ही कॉमर्स जेएमटी आर्ट्स अँड जेजेपी सायन्स कॉलेज आणि वाडी एमआईडीसी येथील आईआन डिजिटल झोन- २ मध्ये ऑनलाईन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. ही परीक्षा दोन सत्रात घेण्याचे नियोजन होते. पहिले सत्र सकाळी ९.३० ते १२ वाजतापर्यंत आणि दुसरे सत्र दुपारी २.३० से ५ वाजेपर्यंत होते. परंतु तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पहिल्या सत्राची परीक्षा नियोजित वेळेत सुरू होऊ शकले नाही.

परीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षेसाठी वापरण्यात आलेले सर्वर डाऊन झाले होते. पहिल्या सत्राच्या परीक्षा बराच वेळ सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे ही परीक्षाच रद्द करावी करण्यात आली. दोन्ही सत्रातील परीक्षा रद्द करण्यात आली. आता नवीन तारखेला ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यासंदर्भातील माहिती संबंधित उमेदवाराच्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात येईल, अशी माहिती दक्षिण -पूर्व-मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून परीक्षेची तयारी करत होतो. रेल्वे भरती बोर्डाने सहायक इंजीन चालक पदासाठी ऑनलाईन परीक्षा सोमवारी नागपुरातील दोन केंद्रावर आयोजित केली. त्यामुळे आम्ही आनंदीत होतो. आज सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचलो आणि परीक्षेच्या प्रतिक्षेत होता. परंतु वेळ निघून गेलातरी परीक्षा काही होईना. आम्ही केंद्रावर ताटळत बसून होतो. नंतर कळले की, सर्वर डाऊन झाला आहे. त्यानंतर तासानंतर परीक्षा रद्दच केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फार निराश झाला. पुन्हा ही परीक्षा केव्हा होईल. याची प्रतीक्षा आहे, असे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

Story img Loader