नागपूर : गीतांजली एक्सप्रेसमध्ये एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. विनोद सलगे (३५) रा. देशपांडे ले – आऊट असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली. विद्यार्थिनी उच्चशिक्षित असून मूळची अकोल्याची रहिवासी आहे. शिक्षणासाठी ती नागपुरात राहतेे. घरी जाण्यासाठी ती नागपूर रेल्वे स्थानकावर आली. तिकीट घेतले आणि  गाडीच्या प्रतीक्षेत होती.  विनोद हा सुध्दा अकोल्याला जात होता. तो विम्याचे काम करतो. पीडितेशी तो बोलण्याचा प्रयत्न करीत होता. प्रवासी म्हणून ती सुध्दा बोलली. दरम्यान, फलाट क्रमांक तीनवर गाडी आली.  विनोदही तिच्या मागावर होता.  भ्रमणध्वनी क्रमांक मागत होता. यादरत्याने त्याने तिचा विनयंभंग केला. या प्रकारामुळे संतप्त  विद्यार्थिनीने कुटुंबीयांना माहिती दिली. अकोला रेल्वे स्थानकावर नातेवाईक आले व आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा