नागपूर : देशातील रेल्वेचे वेळापत्रक कोसळले असून अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवासी ठिकठिकाणी कित्येक तास ताटळत आहेत. तसेच रेल्वेगाड्यांच्या विलंबामुळे प्रवाशांना गंतव्यावर पोचण्यास उशीर होत आहे. सर्वदूर पडत असलेला पाऊस आणि ठिकठिकाणी सुरू असलेले रेल्वे मार्गाचे (तिसरा मार्ग) काम यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या तब्बल १६ रेल्वेगाड्या शुक्रवारी उशिरा नागपुरात पोहचणार आहेत.
हेही वाचा >>> नागपूर: १६ हजार ग्राहकांचे वीज देयक निम्याहून कमी; ही योजना पहा…
विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये हावडाकडे जाणारी गितांजली एक्सप्रेस सहा तास, सिकंदराबाद एक्सप्रेस चार तास ४२ मिनिटे, सीएसएमटी-नागपूर दुरान्तो एक्सप्रेस दोन तास २५ मिनिटे, हैदराबाद स्पेशल एक्सप्रेस दोन तास ४६ मिनिटे, पुरी-जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस तीन तास, रीवा-निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस दोन तास १० मिनट, शालीमार-एलटीटी एक्सप्रेस चार तास ५० मिनटे, यशवंतपुर-लखनऊ एक्सप्रेस दोन तास ४७ मिनिटे, हावड़ा-सीएसएमटी मेल पाच तास, शालीमार-एलटी एक्सप्रेस सहा तास २५ मिनिटे, पुरी-आदिलाबाद साप्ताहिक एक्सप्रेस चार तास २९ मिनिटे, हावड़ा-पुणे आजाद हिंद एक्सप्रेस सात तास ११ मिनिटे, संघमित्रा एक्सप्रेस नऊ तास ५५ मिनिटे, हावडा-अदिलाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस दोन तास, हावड़ा-पुणे दुरांतो एक्सप्रेस सात तास उशिरा धावत आहे.