नागपूर : एकीकडे वंदे भारत एक्सप्रेससारख्या वातानुकूलित रेल्वेगाडीतून अत्याधुनिक सुविधा मिळायला सुरुवात झाली, तर दुसरीकडे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे ‘कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांना त्यांच्या आरक्षित जागेवर बसण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.

स्वदेश निगम यांचे कुटुंब १२५२२ एर्नाकुलम-बरौनी एक्सप्रेसने नागपूरहून लखनऊला निघाले होते. ही गाडी नागपुरात आली आणि निगम कुटुंबीय एस-४ मध्ये बसण्यासाठी गेले. परंतु, त्या रेल्वेडब्यात इतकी गर्दी होती की, त्यांना डब्यात चढण्यासाठी कसरत करावी लागली. त्यांच्या आरक्षित जागेवर इतर लोक बसलेले होते आणि ते तेथून उठण्यास तयार नव्हते. निगम कुटुंबीयांनी तिकीट तपासणीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीही त्या डब्यात आले नाही. त्यानंतर निगम कुटुंबीयांना मिळेल तेथे बसून प्रवास करावा लागला. अशाप्रकारे ‘कन्फर्म’ तिकीट असूनही प्रवाशांना यातना सहन कराव्या लागत आहे. विशेष म्हणजे याची कोणीही दखल घेत नाही. यासंदर्भात भारतीय यात्री केंद्राने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा

हेही वाचा – ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्रासाठी तारखेच्या अटीमुळे कोंडी; करोना काळातील जाहिरात असल्याने काही उमेदवार अपात्र

हेही वाचा – ‘समृद्धी’वर भीषण अपघातात;दोन मुलांसह सहा मृत्युमुखी; भर वेगातील मोटार कठडय़ावर आदळली

निगम कुटुंबीयांचे एस-४ मध्ये सहा बर्थ कन्फर्म होते. परंतु, त्यांना बसण्यास जागा मिळाली नाही. गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छतागृहात जाण्यास अडथळा निर्माण होत होता. ‘टीटीई’ या रेल्वेत आले नाही. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनीदेखील ढुंकून पाहिले नाही, असे भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी सांगितले.

Story img Loader