अकोला : पश्चिम विदर्भातून पुण्यासाठी आणखी एक गाडी धावणार आहे. नियमित अमरावती-पुणे एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. ११०२५ / ११०२६ भुसावल – पुणे एक्सप्रेस (मार्ग नाशिक, पनवेल ) या रेल्वेचा मार्ग बदल व विस्तार करून ११०२५ / ११०२६ अमरावती – पुणे एक्सप्रेस अकोला, भुसावळ, मनमाड, अहमदनगर मार्गे लवकरच सुरू होणार आहे. ही रेल्वे आठवड्यातील सातही दिवस धावणार आहे.
हेही वाचा >>> पाच कोटी सोने तस्करीचा तपास आता मुंबईतून; डीआरआयच्या मुख्य कार्यालयाकडून सखोल तपासणी
सध्या अकोला ते पुणे १५ रेल्वे असून १२ नियमित व तीन विशेष रेल्वे धावत आहेत. ११०२५ / ११०२६ अमरावती-पुणे एक्सप्रेस ही सोळावी रेल्वे अकोला मार्गे पुणे करीता असेल. तसेच १२११९ / १२१२० अमरावती – अजनी (नागपुर) इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे गाडी आठवड्यातील सहा ऐवजी आता सात दिवस धावणार आहे. हे बदल लवकर सोयीस्कर तारखेपासून लागू केले जातील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.