अकोला: दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाच्या कागजनगर आणि बल्लारशाह रेल्वेस्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या सुरुवातीस ‘नॉन-इंटरलॉकिंग’ कामाच्या संदर्भात पायाभूत सुविधांचे कार्य केले जाणार आहे. त्यामुळे दोन गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.कागजनगर-बल्लारशाहदरम्यान ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’ चे कार्य १४ सप्टेंबरपर्यंत, ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’ काम १० ते २२ सप्टेंबरपर्यंत तर ‘नॉन-इंटरलॉकिंग’ कार्य २२ ते २६ सप्टेंबरदरम्यान करण्यात येणार आहे. या कामामुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांवर परिणाम होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२२१५१ पुणे-काझिपेट एक्सप्रेस २२ सप्टेंबर रोजी, तर २२१५ काझिपेट-पुणे एक्सप्रेस २४ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. २०८०३ विशाखापट्टनम -गांधीधाम एक्सप्रेस १४, २१ सप्टेंबर रोजी व २०८०४ गांधीधाम – विशाखापट्टनम एक्सप्रेस २४ सप्टेंबरला नागपूर मार्गे वळविण्यात आली आहे. २४ रोजी २०८१९ पुरी-ओखा एक्सप्रेसला चंद्रपूर आणि बल्लारशाह येथे थांबा राहणार नाही. १२६५५ अहमदाबाद-चेन्नई एक्सप्रेस २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान व १२६५६ चेन्नई -अहमदाबाद एक्सप्रेस २१ ते २६ दरम्यान अकोला मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या गाडीला बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारशाह येथे थांबा राहणार नाही. रेल्वे गाड्या रद्द व इतर मार्गाने वळविण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे.