नागपूर : मध्य प्रदेशात निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी रेल्वेने इंदूर ते भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत केला. ही गाडी सोमवारी दुपारी अडीच वाजता नागपुरात आली आणि दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी इंदूरकडे रवाना झाली.मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची सोमवारी घोषणा झाली. त्यापूर्वीच म्हणजे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी रेल्वेने अतिशय वेगाने निर्णय घेऊन वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेडा दाखून उदघाटन करतात. पण नागपूरसारख्या महत्वाच्या शहरासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होऊन ही कोणताही सोहळा आयोजित करण्यात आला नाही. कारण, ही गाडी सुरू होईल, याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत कल्पना नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०९११ आणि २०९१२ इंदूर-भोपाळ वंदेभारत एक्स्प्रेस वंदेभारत एक्सप्रेसचा विस्तार नागपूरपर्यंत करण्याची अधिसूचना रविवारी सायंकाळी काढण्यात आली. ही गाडी इंदूर येथून सकाळी ६.१० वाजता निघेल. दुपारी अडीच वाजता नागपुरात येईल. ही गाडी उज्जैनला सकाळी ७ वाजता, भोपाळ सव्वानऊ वाजता, इटारसी येथे पावणे अकरा वाजता येईल. तर नागपूर ते इंदूर वंदेभारत एक्सप्रेस नागपूर येथून दुपारी ३.२० वाजता निघेल. रात्री पावणे बारा वाजता इंदूर येथे पोहोचेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways extend indore to bhopal vande bharat express to nagpur ahead of election code of conduct in madhya pradesh rbt 74 amy
Show comments