अकोला : अनारक्षित तिकीट खरेदीचा हायटेक पर्याय रेल्वेने ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल २.५६ लाख प्रवाशांनी मोबाइल ॲपद्वारे तिकीट बुक करून आपला वेळ वाचवला. भुसावल विभागाला त्यातून ७०.७३ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले. रेल्वेकडून तीन टक्के बोनसही मिळत असल्याने प्रवाशांना मोठा लाभ होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘यूटीएस ऑन मोबाईल ॲप’ वेळ आणि संसाधनांची बचत करणारे प्रभावी साधन ठरत आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अनारक्षित तिकीट खरेदीची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यासाठी ॲपला प्रोत्साहित केले. जनजागृती अभियान आणि डिजिटल सेवांच्या सुलभ वापरामुळे हे ॲप प्रवाशांसाठी उपयुक्त ठरले. डिसेंबर महिन्यात भुसावळ विभागात दोन लाख ५६ हजार १९८ प्रवाशांनी ‘यूटीएस ऑन मोबाइल’ ॲपद्वारे तिकीट घेतले. याद्वारे भुसावळ विभागाला ७०.७३ लाखांचा महसूल प्राप्त झाला. यामुळे रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित तिकीट खिडकीवरील लांब रांगेतून प्रवाशांची सुटका झाली. तसेच वेळेची देखील बचत झाली.

हेही वाचा >>>अमरावती: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, महिनाभरातील चौथा बळी

ॲपद्वारे तिकीट खरेदीमुळे तिकीट खिडकीवर दीर्घ प्रतीक्षा करण्याची गरज राहत नाही. कुठूनही, कधीही तिकीट घेता येत असल्याने वेळेची बचत होते. पर्यावरणपूरक पेपरलेस तिकीट प्राप्त होते. डिजिटल पेमेंटसह तिकीट घेतांना चिल्लरची अडचण येत नाही. अनारक्षित तिकीट प्रवाशांसाठी वेळेची बचत आणि तणावरहित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ‘यूटीएस ऑन मोबाइल ॲप’ अत्यंत फायदेशीर आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर ॲपची सुविधा आहे. आपल्या मोबाइलमध्ये ‘यूटीएस’ हे ॲप डाऊनलोड करता येते. मोबाइलनंबरद्वारे साइन अप होते. ‘आर-वॉलेट’ वापरून तिकीट घेता येते. ‘आर-वॉलेट’ रिचार्जवर रेल्वेकडून तीन टक्के बोनस दिला जातो. या माध्यमातून डिजिटल इंडिया स्वप्नाच्या पूर्ततेसाठी मोलाचे योगदान मिळाले.

सहा ‘आरएच गर्डर्स’ टाकण्याची विक्रमी कामगिरी

भुसावळ विभागात रेल्वेच्या इतिहासात प्रथमच भुसावळ ते अकोला विभागातील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १० ए पूल  येथे एकाच दिवसात सहा ‘आरएच गर्डर्स’ टाकून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. यापूर्वी, २ जानेवारी रोजी भुसावळ ते खंडवा विभागात एकाच दिवशी चार ‘आरएच गर्डर्स’ टाकण्याचा विक्रम होता. यासाठी १० पोकलॅन, ११ फरहाना आणि आठ डंपर तैनात करण्यात आले होते. या प्रचंड यंत्रसामग्रीच्या मदतीने अवघड आणि महत्त्वपूर्ण काम अतिशय कौशल्याने पूर्ण करण्यात आले.