नागपूर : राज्य वन्यजीव मंडळाने गठीत केलेल्या समितीने चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील वन्यप्राण्यांचे मृत्यू थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवूनही रेल्वेमंडळाची आडमुठी भूमिका वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. २०१८ साली वाघाच्या तीन बछडय़ांच्या मृत्यूनंतर ही समिती गठीत करण्यात आली होती.

रेल्वेमार्गावर सातत्याने वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या मृत्यूनंतर आणि विशेषकरुन २०१८ साली वाघाच्या तीन बछडय़ांच्या मृत्यूनंतर २०१८-१९ मध्ये याबाबत समिती गठीत करण्यात आली होती. आतापर्यंत या समितीच्या अनेक बैठका झाल्या. या मार्गावरील वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग, संवेदनशील क्षेत्र समितीच्या सदस्यांनी स्पष्ट केले. या अपघातामागील नेमक्या त्रुटी समजून घेत अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी वनखात्याने नागपूर येथील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना याबाबत अहवाल सादर केला असून त्यात काही सूचनाही केल्या आहेत. या मार्गावर १९ अशी ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी रेल्वेची गती किमान ४० किलोमीटर प्रति तास असायला हवी. ब्रम्हपूरी आणि चंद्रपूर विभागातील मामला, जुनोना, सिंदेवाही, चिचपल्ली, तळोधी, बाळापूर, नागभिड या अतिसंवेदनशील ठिकाणांवर नवीन भूयारी मार्ग सुचवण्यात आले होते. मात्र, आजतागायत या उपाययोजनांची अंमलबजावणी रेल्वेमंडळाकडून करण्यात आलेली नाही. या मार्गावरील रेल्वेचा सरासरी वेग अजूनही ६६.५ किलोमीटर प्रति तास आहे. मालगाडय़ांव्यतिरिक्त इतरही आठवेळा या मार्गावरुन रेल्वे जातात. वन्यप्राणी रस्ता ओलांडताना दिसल्यास वाहनांचा वेग कमी करावा, शिटय़ा वाजवाव्या, फ्लॅशलाईटचा वापर करावा अशा सूचना रेल्वेच्या चालकाला दिल्याचे मंडळाचे अधिकारी सांगतात. मात्र, हा त्यावरचा पर्याय नाही. आता वडसा-गडचिरोली हा नवीन रेल्वेमार्ग तयार होत आहे. या परिसरात देखील वाघांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. सध्या हा विषय राज्य वन्यजीव मंडळाकडे प्रलंबित असल्याने मंडळ काय भूमिका घेणार, याकडे वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
Dog Sterilising Centre vasai virar
वसई : पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र बंद, पालिकेकडून दुरुस्तीचे काम; नवीन निर्बिजीकरण केंद्र ही रखडले
police lathicharge on citizens thronged in Kitadi forest area to see tiger
भंडारा : वाघ पाहण्याची उत्सुकता; तुफान गर्दी अन् पोलिसांवरच …

वर्धा जिल्ह्यात बिबटयाचा मृत्यू

कारंजा तालुक्यातील सुसूनद्रा गावालगत जंगलातील दुर्गम भागात दोन वर्षीय बिबटय़ाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था फार वाईट असल्यामुळे बिबटय़ा नर आहे की मादी, हे ओळखणेसुद्धा कठीण झाले आहे. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बिबटय़ाचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

झाले काय? गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगावच्या जंगलात कोरंबी गावाजवळ शनिवारी सकाळी रेल्वे रुळावर वाघाचा मृतदेह आढळून आला. सुमारे पाच वर्षे वयाचा हा वाघ होता. प्राथमिक अहवालात रेल्वेच्या धडकेने वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा रेल्वे मंडळाची भूमिका चर्चेत आली.

उपाय सुचवूनही..

  • हा रेल्वे मार्ग सुमारे ६० किमी दाट जंगलातून गेला आहे. हा मार्ग वन्यप्राण्यांसाठी भक्षक ठरला असून यापूर्वीदेखील वाघ, बिबटय़ा, अस्वल अशा अनेक प्राण्यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे.
  • या प्रश्नासंबंधी गठीत राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ज्ञ समितीद्वारे रेल्वे मंडळाला कळवण्यात आले आहे. तसेच प्रभावी उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत.
  • मात्र, रेल्वे मंडळाने अजूनही कार्यवाही केलेली नाही, असे राज्य वन्यजीव मंडळ तथा तज्ज्ञ समितीचे सदस्य किशोर रिठे यांनी सांगितले.

Story img Loader