वर्धा : प्रवासी व मालवाहतूक भाड्याखेरीज अन्य स्त्रोतातून कमाई करण्यात मध्य रेल्वे अव्वल ठरली आहेच. आता लोखंडी भंगार उत्पन्नाचे मोठा स्त्रोत ठरत आहे. मध्य रेल्वेने ‘झिरो स्क्रॅप मिशन’ हे अभियान राबवले. सर्व स्थानके, विभाग प्रतिष्ठाने, कार्यशाळा, शेड अशा सर्व विभागातील भंगार साहित्य गोळा करण्यात आले. त्याच्या विक्रीतून ४८३ कोटी २९ लाख रुपये जमा झाले आहेत. खात्याने गत वर्षासाठी ३५५ कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत अधिक भंगार महसूल गोळा झाला. ३६ टक्क्यांहून अधिक हे प्रमाण आहे. भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसुली फायदाच नव्हे तर परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. आतापर्यंतचा हा भंगार विक्रीतून जमा झालेला सर्वाधिक महसूल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader