यवतमाळ : शनिवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आणि महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम होत आहे. आर्णी मार्गावरील किन्ही येथे होत असलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असताना सकाळी सव्वा अकरा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मुख्यमंत्री दाखल होण्यापूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावली, अशी चर्चा कार्यक्रम स्थळी सुरू झाली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारबद्दल महिलांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हानिहाय दौरे करून वचनपूर्ती सोहळयात सहभागी होत आहे. यवतमाळ येथे किन्ही शिवारात आज हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री संजय राठोड आणि सर्व सत्ताधारी आमदार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दुपारी सव्वाबारा वाजता यवतमाळात दाखल होणार आहे. हवामान विभागाने आजपासून चार दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविला होता. तर शुक्रवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. आज शनिवारी सकाळी वातावरण कोरडे होते. मात्र १० वाजल्यापासून आभाळ भरून आले आणि ११ वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कार्यक्रमस्थळी जिल्ह्यातून महिला दाखल होत असताना पावसाने हजेरी लावल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ उडाला. भव्य मंडप वॉटर प्रुफ असल्याने आत अडचण नाही. मात्र बाहेरच्या परिसरात आणि पार्किंगच्या ठिकाणी चिखल झाल्याने कार्यक्रमास आलेल्या महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर आणि कार्यक्रमस्थळी, शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची पावसामुळे त्रेधा उडाली. कार्यक्रमाच्या ऐन वेळी पाऊस कोसळल्याने कार्यक्रमाच्या उपस्थितीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसामुळे कार्यक्रम विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray on Badlapur
Raj Thackeray : “रोज येणाऱ्या अत्याचारांच्या वृत्तांमागे राजकारण की येणाऱ्या निवडणुका?”, राज ठाकरेंचा थेट प्रश्न; म्हणाले, “सरकारला बदनाम…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sharad pawar pune protest speech
Sharad Pawar in Pune Protest: “मला एका गोष्टीचं दु:ख होतंय की…”, शरद पवारांनी मांडली भूमिका; पुण्यात भर पावसात आंदोलन, उपस्थितांना दिली शपथ!
supriya sule pune protest
Badlapur School Girl Rape Case: पुण्यात शरद पवार गटाचं भर पावसात आंदोलन, सुप्रिया सुळेंचं आक्रमक भाषण; मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करून म्हणाल्या…
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
amruta fadnavis on nanakram nebhnani gunfor women
Amruta Fadnavis on Women Safety: “दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी चालेल, पण..”, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक

हेही वाचा…Raj Thackeray : “रोज येणाऱ्या अत्याचारांच्या वृत्तांमागे राजकारण की येणाऱ्या निवडणुका?”, राज ठाकरेंचा थेट प्रश्न; म्हणाले, “सरकारला बदनाम…”

लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळात महिला सशक्तीकरण मेळावा झाला होता. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आजचे महिला सशक्तीकरण अभियान होत आहे.

हेही वाचा…“बदलापूरमधील ती शाळा भाजपा आणि संघाशी संबंधित,” काँग्रेसचा आरोप…

जिल्हाभरातून महिलांना आणण्यासाठी एक हजार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना बसमध्येच खाद्य पदार्थ आणि पाण्याची बॉटल देण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी १०० वैद्यकीय चमू व सात रूग्णवाहिका उपलब्ध आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख महिलांना लाभ देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरूपात काही महिलांना योजनांचा लाभ वितरण करण्यात येणार आहे. सभामंडपात भव्य रॅम्प उभारण्यात आला असून मुखमंत्री महिलांशी संवाद साधून राखी बांधून घेणार आहेत.