नागपूर: थंडीचा जोर ओसरून पुन्हा एकदा राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या उपराजधानीसह अनेक भागात सकाळपासून आभाळी वातावरण असून आज, शनिवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशासह राज्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. थंडीत वाढ होत असतानाच अचानक पावसाचे वातावरण तयार होत आहे. आता तर थंडीला बऱ्यापैकी सुरुवात झाली असतानाच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस कोसळला. तर आज, शनिवारी देखील पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
हेही वाचा… शेतकऱ्याचा रौद्रावतार! हाती कोयता व ‘गन’ घेऊन…
आग्नेय दिशेने येणाऱ्या बाप्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पावसाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर देखील ओसरला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.