लोकसत्ता टीम

नागपूर: नागपुरात उन्हाळ्यामुळे एकीकडे तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. त्यातच अधून- मधून पाऊस पडत आहे. त्यामुळे वारंवार वातावरण बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊन व्हायरल आजार बळावण्याचा धोका वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Maximum temperature drop in Mumbai,
मुंबईच्या कमाल तापमानात घट
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
experienced cold temperatures for past few days cold will remain in Mumbai till end of month
मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार
pune cold spell in Pune subsided with temperatures rising and light rain expected from December 26
थंडीचा कडाका सरला, आता हलक्या पावसाची चिन्हे
Mumbaikars are suffering from afternoon heat despite cool mornings for past few days
उकाड्याने मुंबईकर हैराण

बदलत्या वातावरणामुळे मुलांना दमा, श्वसनाच्या आजारासह त्वचेचे विकार होण्याची जोखीम असते. अशा वेळी तब्येतीची काळजी घेणे महत्वाचे ठरते. अचानक पावसामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यूसह इतरही किटकजन्य आजार बळावण्याचा धोका आहे.

आणखी वाचा- तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत

नागपूरसह विदर्भात अकाली वातावरण बदलाचा मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. पाऊस, थंडी, ऊन्हाच्या वातावरणात काही विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजारांचे मुलांवर लवकर आक्रमण होते. त्यामुळे मुलांचे आरोग्य जपण्यासाठी सुरक्षात्मक उपायोजनांवर पालकांनी भर द्यावा. आपल्या घरातील वातावरण उबदार असावे. परिसर स्वच्छ ठेवावा, असा सल्ला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) वैद्यकीय अधिक्षक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.

आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

घरातील ओला व सुका कचरा वेगळा ठेवा, भांडी- कपडे ओलसर ठेवू नका, स्वयंपाक करण्याची जागा स्वच्छ ठेवा, लहान मुलांची खेळणी ओलसर झाली की, एकदा निर्जुंतक पाण्यातून विसळून घ्यावीत, जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, उघड्यावरील अन्नपदार्थ आणि शिळे अन्नपदार्थ खाऊ नये, तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळावेत.

आणखी वाचा-फडणवीस निवडणूक सभेत म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीनमधील फरकाची रक्कम…

लक्षणे

ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, मुलांमध्ये पोटदुखीचा त्रास, त्वचेचे आजार होण्याची भीती, व्हायरल डायरियाचा धोका आहे.

ही घ्यावी काळजी

  • लहान मुलांच्या आहारात सुकामेवा असावा, दररोज फळ, दूध आदींचा समावेश करावा, शरीर गरम ठेवण्यासाठी मुलांची तेलाने मालिश करावी
  • मुलांना कोवळ्या उन्हात ठेवावे. कोमट पाण्याने अंघोळ घालावी.
  • मुलांना उकळून गार केलेले पाणी पिण्यास द्यावे, मुलांना दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजावे, असेही डॉ. गावंडे यांनी सांगितले.

लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती नाजूक असते. वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, खोकला हे सिझनल आजार होण्याची शक्‍यता असतेच. परंतु या वातावरण विषाणू हवेव्दारे पसरतात. तसेच बाल दमा, डेंग्यू वाढण्याची जोखीम आहे. त्वचाविकार होण्याचा धोका आहे. दिवसांत सोडा, कोल्ड ड्रिंक्स, कॅंडीज, चॉकलेट, रिफाइंड व प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून मुलांना दूर ठेवा. ताजे व हलका आहार घेण्यावर भर द्यावा. -डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

Story img Loader