वर्धा : सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील पाणी साठ्याची स्थितीच बदलून गेली आहे. काही तालुक्यांत विक्रमी वृष्टी झाली आहे. आजही सकाळपासून पावसाची हजेरी लागल्याने सकाळी सात वाजता लाल नाला प्रकल्पातील जल पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पाच दरवाजे उघडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रती सेकंद ३२६९ घन फूट इतका विसर्ग नदीपात्रात सोडल्या जात आहे. परिणामी लाल नाला, पोथरा व वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे. काल शनिवारी सायंकाळी निम्न वर्धा धरणाच्या अकरा दारांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सततच्या पावसाने धरणातील पाण्याची आवक वाढू लागली आहे. इतरत्र कुठेही धोक्याची घंटा अद्याप वाजलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – NAG PANCHAMI 2023 : उद्या नागपंचमी; जाणून घ्या महत्त्व, इतिहास; काय आहे वर्ज्य?

हेही वाचा – “माझ्या घराचे दरवाजे २४ तास उघडे”, धनंजय मुंडेंच शेतकऱ्यांना भावनिक आवाहन, ४ मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

वर्धा तालुक्यातील मदणी येथील धाम नदीवरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्ता सद्या वाहतुकीस बंद आहे. वर्धा तालुक्यातीलच करंजी भोगे ते पुजई, पवनी, सोंडलापूर मार्गावर पुरामुळे वाहतूक बंद आहे.