चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अंग भाजून काढणारे उन्ह आणि उकाड्यामुळे हैराण नागपूरकरांना गुरुवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने दिलासा मिळाला. दरम्यान अमरावती शहरातही वादळी पाऊस झाला. काही भागात वीज पुरवठा खंडित झाला.

 सर्वांचे लक्ष मान्सूनकडे लागलेले असताना नागपूरमध्ये मात्र तापमानवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. तापमानातील चढउतारामुळे उकाड्यातही वाढ झाली होती. सर्वांच्या नजरा पावसाकडे लागलेल्या असतानाच दुपारी वातावरणात बदल होत सोसाट्याच्या वाऱ्याला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागात पावसाच्या सरीही आल्या. व्हीएनआयटी, माटे चौक, लक्ष्मीनगर, सुभाषनगर व इतरही भागातही पाऊस पडला. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वीज तारा तुटल्या, काही भागांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता.