बुलढाणा: मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दमदार पुनरागमन करीत लाखो हेक्टरवरील खरीप पिकांना नवसंजीवनी दिली! यामुळे पंचविस लाख जिल्हावासीयांना मोठ्ठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सव काळात हमखास पाऊस पडतो ही जिल्हावासीयांची श्रद्धा खरी ठरली. गौरी आगमनाला गुरुवारी रात्री जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. बहुतेक ठिकाणी रात्रभर संमिश्र पाऊस कोसळत राहिला.
हेही वाचा… चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
बुलढाणा ५६ मिमी , चिखली ३७,मेहकर ५०.४ मिमी, मलकापूर ६० ,मोताळा ४३.३ मिमी,जळगाव जामोद ३५ , या तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. उर्वरित तालुक्यात १२ ते २९ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली.
हेही वाचा… पं.भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती जाहीर; कोण ठरले पात्र व कश्यामुळे वाचा..
जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी चे थैमान अनुभवायास मिळाले. जळगाव तालुक्यातील जळगाव मंडळात ८७.२५ मिमी, मेहकर तालुक्यातील कल्याणा मंडळात ८५.२५ मिमी, शेगाव तालुक्यातील शेगाव मंडळात ८४.५० मिमी, मलकापूर तालुक्यातील मलकापूर व धरणगाव मंडळाला प्रत्येकी ७२.७५ मिमी इतक्या कोसळधार पावसाने झोडपले.