लोकसत्ता टीम
चंद्रपूर: मागील दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असताना शनिवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली. मार्च महिना सुरू होताच शहरात कडक उन्हं तापायला सुरुवात झाली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. उन्हाचा पारा ४२ अंशाच्या समोर गेला असताना ढगाळ वातावरण मुळे गारवा आहे. अशातच शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या.
आणखी वाचा- गोंदियात वादळी वाऱ्यासह पाऊस, वीज पुरवठा काही काळ खंडित, पिकांचे नुकसान
त्यानंतर मध्यरात्री देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जवळपास १० ते १५ मिनिट पाऊस सुरू होता. रिमझिम पाऊस सुरूच असून ढगाळ वातावरण कायम आहे. आकाशात काळे ढग जमा आहेत. त्यामुळे दिवसभर कधीही पाऊस कोसळू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.