नागपूर : राज्यातून गेले अनेक दिवस बेपत्ता झालेला मान्सून आता पुन्हा परतला आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस होत आहे. राज्यातील नंदुरबार, वाशीम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा – भारतात नामबदलाची परंपरा जुनीच, यापूर्वी राज्य आणि राजधान्यांचेही नामकरण

हेही वाचा – एमपीएससीकडून दोन महिन्यांतच मोठ्या परीक्षेचा निकाल जाहीर; उत्तीर्ण उमेदवारांनो आता…

आज विदर्भातील काही भागांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे अनेक भागांत उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain will increase in maharashtra from today yellow alert for vidarbha and marathwada rgc 76 ssb
Show comments