लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चंद्रपूर: अडीच मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया तसेच ईदच्या मुहूर्तावर शहरात वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पावसाला दुपारी तीन वाजताच्या सुमारास सुरूवात झाली. हा पाऊस सर्वदूर आहे. विशेष म्हणजे काल शुक्रवारी सायंकाळी ८ ते ८.३० या वेळेत आलेल्या वादळी पाऊसामुळे शहर तथा जिल्ह्यातील अनेक भागात २० ते २५ झाडे कोसळली आहेत. त्यामुळे अनेक भागातील वीज व पाणी पुरवठा खंडित झाला आहे. वडगाव परिसरात मोबाईल टॉवर कोसळले आहे. सुदैवाने जीवीतहानी टळली आहे.
शहरात आज दुपारी तीन वाजतापासून वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व पावसाला सुरूवात झाली. या पावसाचा व ढगांच्या कडकडाटाचा जोर चांगलाच आहे. आकाशात काळे ढग एकत्र आले असून पावसाची रिमझीम सुरूच आहे. सर्वत्र अक्षय तृतीया व मुस्लीम बांधवांची ईद सुरू असतांनाच अचानक या पावसाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असता रामनगर, सिव्हील लाईन, शास्त्री नगर, मुल रोड, कस्तुरबा गांधी मार्ग, आझाद बगीचा, नागपूर रोड या भागात अनेक झाडे कोसळली. त्याचा परिणाम वीज पुरवठा खंडित झाला.
वादळामुळे अनेक ठिकाणी तुटलेले झाड, फांद्या हटवून दुरुस्ती काम सुरु आहे. ३३ केव्ही विश्वकर्मा स्टेशन आणि जेबी नगर स्टेशनचे सर्व ११ केव्हीं फिडर अनेक ठिकाणी झाडे, कंडक्टर तुटल्यामुळे विजखंडित झाली आहेत. नागपूर मार्गावरील जिल्हाधिकारी, न्यायाधीश तसेच इतर व्हीव्हीआयपी यांच्या बंगल्यांसह सिव्हिल लाईन परिसरतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पेट्रोलिंग व दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच वादळ वाऱ्यामुळे ईरई धरण, ईरई नदी व रामनगर जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा बंद झालेला आहे. शहराच्या विविध भागातील १५ ते १६ झाडे हटवून रात्रीच रस्ता मोकळा करण्यात आला तर उर्वरीत ठिकाणची झाडे हटविण्याचे काम सुरु आहे.