वर्धा : उत्साहात मतदान झालेल्या वर्धा मतदारसंघात अंतिम टप्प्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रक्रियेस विलंब झाला. मोर्शी व धामणगाव विधानसभा क्षेत्रात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मतदार गोंधळले. त्यांना शेडमध्ये घेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मतदान प्रक्रिया लांबली. आता रात्री सर्व सोपस्कार पूर्ण झाले.
काही ठिकाणी मतदारांनी मत देत असल्याचा व्हिडीओ काढला. हे नियमाविरुद्ध अशे म्हणून अधिकारी वर्गाने त्वरित दखल घेत गुन्हा दखल केला आहे.मतदान टक्केवारीत वाढ होण्याची विविध राजकीय करणे दिल्या जातात. पण आज विशेष आदेश काढून मतदान मोठ्या प्रमाणात व्हावे म्हणून प्रशासन प्रयत्नशील होते असे सांगण्यात आले.
हेही वाचा >>>वाशीम जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदानाचा अंदाज
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले म्हणाले, की उद्योग, वैद्यकीय, हॉस्पिटॅलिटी व अन्य समूहास त्यांच्या आस्थापनेत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे मतदान व्हावे म्हणून सूचित करण्यात आले होते. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदानापासून कोणी वंचित राहू नये ही काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान दरम्यान एक दोन दुःखद घटना घडल्या. एका मतदान अधिकाऱ्याच्या भावाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यास सुट्टी देण्यात आली. तसेच एकाच्या कुटुंबातील सदस्याला पॅरालेटीक धक्का बसला. पण त्याने मतदान कर्तव्य बजावून मगच कार्यभार सोडला, अशी माहिती मिळाली.