नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचे महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गंत पश्चिम आणि पूर्व विदर्भात विदर्भ निर्माण संकल्प मेळावा आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती माजी आमदार वामनराव चटप यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा – वर्धा : सहकारी सूतगिरणीवर माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख गटाचा झेंडा
हेही वाचा – बुलढाणा : ‘लम्पी’ आटोक्यात, प्राण्यांची वाहतूक व बाजारास मुभा; ३ महिन्यांपासून होती बंदी
चटप म्हणाले, विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे विदर्भ राज्य व्हावे म्हणून आंदोलन करीत आहे. पण, राज्यकर्ते या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे गावागावात विदर्भ राज्य चळवळ पोहोचवण्यासाठी समितीने कार्यक्रम आखला आहे. त्यापुढील टप्पा जनजागरणाचा असून दोन संयुक्त मेळावे घेण्यात येत आहेत. मिशन २०२३ अंतर्गत पश्चिम विदर्भात २९ ऑक्टोबर २०२३ रोजी मेहकर येथे संयुक्त मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. पूर्व विदर्भाचा संयुक्त मेळावा १९ नोव्हेंबरला भंडारा येथे होणार आहे, असेही चटप म्हणाले.