अकोला : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अकोला दौऱ्यादरम्यान रविवारी मनसैनिक दिवंगत जय मालोकार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने ३० जुलै रोजी मृत्यू झाला होता.

राज ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या आई-वडिलांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. जय मालोकार यांच्या आईने घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर राज ठाकरे यांनी निश्चित पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

Aditya Thackeray power show , Aditya Thackeray latest news, Aditya Thackeray marathi news,
वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
Uddhav thackeray
Uddhav Thackeray First List : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ६५ उमेदवारांची नावे एका क्लिकवर!
amit thackeray
“…तेव्हा माझ्या पोटात गोळा आला”; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!
ajit pawar
राजापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; अजित यशवंतराव शिवसेना ठाकरे गटात दाखल
avinash Jadhav anand ashram
उमेदवारी जाहीर होताच मनसेचे अविनाश जाधव आनंद आश्रमात
MLA Yashomati Thakur says Uddhav Thackeray should be the Chief Minister
“उद्धव ठाकरेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत..”, आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या वक्‍तव्‍याची चर्चा

हेही वाचा…विदर्भ क्रिकेट संघाला गळती, नेमके कारण काय?

अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे ‘सुपारीबहाद्दर’ असल्याची टीका केली होती. या टीकेमुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची ३० जुलैला अकोल्यात तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सहभागी मनसैनिक जय मालोकार यांचा त्याच दिवशी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. जय मालोकार यांच्या निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. दरम्यान, या घटनेनंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी अकोला गाठून मालोकार कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज अकोला शहरात दाखल झाले. त्यांनी मनसैनिक जय मालोकार यांचे घर गाठून कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. ३० जुलै रोजी घडलेला सर्व प्रकार राज ठाकरे यांनी जाणून घेतला. सुमारे १० मिनिटे त्यांनी जय मालोकार यांच्या आई-वडिलांसह इतर कुटुंबाशी चर्चा करून सांत्वन केले.

हेही वाचा……अन् राज ठाकरेंनी स्वत: हातात घेतले ‘स्टीअरिंग’, वाशीम ते अकोला दरम्यान नेमकं काय झालं?

‘‘माझा मुलगा घरून गेला तेव्हा पूर्ण चांगला होता. असे काय झाले? की त्याचे निधन झाले. त्याचा घातपात झाला असावा, असा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषीवर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणी मनसेने पाठपुरावा करावा,’’ अशी अपेक्षा जय मालोकार यांच्या आईने राज ठाकरे यांच्याशी बोलतांना व्यक्त केली. राज ठाकरे यांनी कागदपत्रांची पाहणी करून पाठपुरावा करू, असे सांगितले.