मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करत आहेत. तसेच बैठकांच्या माध्मयातून ते पक्षबांधणी करत आहेत. दरम्यान आज त्यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागपूरमधील मनसेची कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती दिली. लवकरच येथे तरुण नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे. मला मागील १६ वर्षांत पक्षीय पातळीवर जी प्रगती दिसायला हवी होती, ती दिसली नाही, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा >>> “वाघ हा वाघच असतो, त्याने डरकाळी फोडली अन्…” दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर

नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी भेटणं झालं. या भेटण्यातून नागपूर शहराची तसेच पक्षातील नागपूर जिल्ह्यातील सर्व पदं मी बरखास्त करतोय. येणाऱ्या २६ आणि २७ तारखेला घटस्थापना होईल, तेव्हा मी नवी कार्यकारिणी जाहीर केली जाई. यामध्ये काही जुने कार्यकर्ते असतील, काही नव्या कर्यकर्त्यांना संधी दिली जाईल. आमची २७ तारखेला मुंबईत पक्षाची बैठक आहे. त्यानंतर २८ तारखेला ते नागपूरमध्ये परत येतील. तेव्हा ते नागपूर तसेच इतर शाखांची बांधणी करतील, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

आज पक्षाला १६ वर्षं झाली. मात्र या काळात मला नागपूरमध्ये जसा पक्ष दिसायला हवा होता तसा दिसत नाहीये. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूरमध्ये पक्ष वाढलेला नाही. नागपूरमध्ये अनेक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना संधी देणे गरजेचे आहे, असे मला वाटते, असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, सिद्ध केलं नाही तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”

मी उद्या चंद्रपूरला जातोय. त्यानंतर अमरावतीला जातोय. दोन वर्षांपासून तुम्ही शांत होते, असे मला विचारले जातो. मात्र सत्ताधारी, विरोधक आणि पत्रकार यांच्यातील दोघे-दोघे बोलत होते. बाकीचे सगळेच शांत होते. आता करोनाची बंधनं उठली आहेत. त्यानंतर आमचा गुढीपाढव्याचा मेळावा झाला आणि राजकारणाविषयी बोलणं सुरू झालं. गुढीपाढव्यानंतर ठाणे, संभाजीनगर येथे माझी सभा झाली, असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो…” म्हणत रामदास कदमांचा हल्लाबोल; म्हटले, “बाळासाहेबांच्या आत्म्याला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवरात्र झाल्यानंतर कोल्हापूरमार्गे मी कोकणात जाणार आहे. कोकणाचा दौरा करणार आहे. त्यानंतर परत दोन-तीन दिवसांसाठी मी नागपूरला येणार आहे. तेव्हा नागपूरमध्ये परत पक्षाची बांधणी करेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.