Raj Thackeray Wardha : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वर्ध्यात मनसैनिकांना संबोधताना अनेक सल्ले, काही कानमंत्र तर बरेच इशारे पण दिले. सुरवात त्यांनी महिलांकडे पाहून केली. सभागृहात महिला मागे बसलेल्या पाहून त्यांनी महिला मागे का, अशी विचारणा केली. महिलांना मग पुढे बसविण्यात आले. तुमची आई, बहीण, पत्नी मागे बसलेली तुम्हास चालेल का अशी पृच्छा करीत महिलांना सन्मान देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू आहे तर दुसरीकडे लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. मनाशी खूणगाठ बांधा. तुमच्या वर्धा जिल्ह्यात जर अशी घटना घडली तर त्यास तिथल्या तिथे ठेचून काढा. मात्र शहानिशा पण करा. वाढती गुन्हेगारी हे चांगले लक्षण नव्हे. खरं तर तुम्हास संघटन बांधणी बद्द्ल सांगायला नको. ही महात्मा गांधी, विनोबांची भूमी. संघटन भक्कम असायला पाहिजे होतं. आता निवडणुका लागतील. संघटना बांधणीसाठी आत्तापासून कामाला लागा. नुसता उत्साह कामाचा नाही. दिवाळीनंतर निवडणुका लागतील. लढवायची की नाही, ईथे कोण उमेदवार हे मी तुम्हास नंतर सांगेल. निवडणुकीचे अनेक चटके फटकेही खाल्ले. कोण कशासाठी लढतोय ते बघितले. अनेकांना तिकीट केवळ पैसे जमवायसाठी हवे असते. हारणे, जिंकण्याचा त्यास फरक पडत नाही.आपल्याकडे हे होतं कामा नये. पक्षातील सहकाऱ्यास मित्र मानायला शिका. रोज भेटा. जाता जाता एव्हढेच सांगतो की गत पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालाय तो घराघरात बघितला गेला. लोकं अत्यंत त्रस्त आहेत. विधानसभेच्या वेळी लोकं वेगळा विचार करतात. गत पाच वर्षांत महाराष्ट्र नासवून टाकला, त्याची चीड लोकांना आहे. लोकांना आपला पर्याय जर खणखणीत दिसला तर ही लोकं आपल्याला सत्तेवर आणतील. याही लोकांना कंटाळले व त्याही लोकांना लोकं कंटाळले आहे. तुम्ही योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला तर यश आपले निश्चित आहे, असा संवाद राज ठाकरे यांनी साधला.

हेही वाचा – फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख रिंगणात? विद्यामान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री लढतीची शक्यता

हेही वाचा – ‘संघप्रमुखांना केवळ विजयादशमीला ‘नारी-शक्ती’ आठवते, मोदींचे मौनही संतापजनक…’ काँग्रेसच्या प्रवक्त्याने……

मनसे पदाधिकाऱ्यांनी चरखा देत त्यांचे स्वागत केले. पक्षनेते अनिल शिदोरे, यशवंत किल्लेदार नंदकुमार चिले तसेच जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे व विद्यार्थी सेनेचे शुभम दांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रांचा राज ठाकरे यांनी आढावा घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray wardha tour made statement on maharashtra politics and party organization pmd 64 ssb